संप मागे घ्या, अन्यथा निलंबनाची कारवाई - FTII चा विद्यार्थ्यांना इशारा

By Admin | Updated: July 15, 2015 19:06 IST2015-07-15T18:46:48+5:302015-07-15T19:06:16+5:30

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला नाही तर निलंबनाची कारवाई केली जाईल अशी नोटीस संस्थेच्या संचालकांनी बजावली आहे.

Undo the suspension, otherwise suspension action - warning to FTII students | संप मागे घ्या, अन्यथा निलंबनाची कारवाई - FTII चा विद्यार्थ्यांना इशारा

संप मागे घ्या, अन्यथा निलंबनाची कारवाई - FTII चा विद्यार्थ्यांना इशारा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १५ - फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला नाही तर निलंबनाची कारवाई केली जाईल अशी नोटीस प्रशासनाने संपकरी विद्यार्थ्यांना बजावली आहे . या नोटीशीमुळे एफटीआयआयचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड केल्याच्या निषेधार्थ संस्थेतील विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. या संपाला महिनाभराचा कालावधी झाला असला तरी अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर एफटीआयआय प्रशासनाने विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. संस्थेचे डायरेक्टर जे नारायण यांनी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना नोटीस पाठवून तातडीने संप मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. संप मागे घेतला नाही तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, यात निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते, अशा प्रकारच्या कारवाईसाठी विद्यार्थीच जबाबदार ठरतील असे या नोटीशीत म्हटले आहे.  

Web Title: Undo the suspension, otherwise suspension action - warning to FTII students