शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावाची कारणे समजून घ्या, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी खास संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 13:11 IST

लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे सध्या चर्चेत आहेत. ते राज्यात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत आणि केंद्रातील तृणमूलच्या नेत्यांची त्यांना गळाभेट घ्यावी लागत आहे. आदेश रावल यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

अविश्वास प्रस्ताव आणण्याचा उद्देश काय?   अविश्वास प्रस्ताव फक्त संख्याबळासाठी आणला जात नाही. अविश्वास प्रस्ताव म्हणजे सरकारवर आमचा अविश्वास आहे. कारण आम्ही वारंवार पंतप्रधानांना सभागृहात येण्याची विनंती करूनही ते येत नाहीत. पंतप्रधान असल्याने त्यांनी यायला हवे. पंतप्रधान सभागृहाबाहेर काही बोलतात; पण, सभागृहात बोलताना संकोच करतात. ज्या मुद्द्यावरून संपूर्ण जगात आपली प्रतिमा डागाळली जात आहे त्यावर पंतप्रधानांनी सभागृहात भाष्य करावे, असा आमचा हेतू होता. पण, पंतप्रधानांनी संपूर्ण विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने आम्ही संसदीय पद्धतीत उपलब्ध पर्याय निवडला. आम्हाला माहीत आहे की, आम्ही हरणार आहोत. संख्याबळ त्यांच्याकडे आहे. पण, हा मुद्दा मांडण्यास आणखी पर्याय नाही. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी सांगितले की, राज्यसभेत त्यांचा माइक बंद करण्यात आला. तुम्हालाही लोकसभेत अशी अडचण येते का? यापेक्षा अधिक त्रास होतो. सभागृहात आम्हाला आमचा मुद्दा मांडण्याची संधी मिळत नाही. मला बोलण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, दुसरीकडे मंत्री पीयूष गोयल आणि प्रल्हाद जोशी म्हणाले की, अधीर रंजन चौधरी यांना बोलू देऊ नका. त्यानंतर माझा माइक बंद करण्यात आला. मिनिटे आणि तासांचा मुद्दा सोडा, आम्हाला एक सेकंदही मिळत नाही. संसदेत भविष्यातील रणनीती काय? सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. अविश्वास प्रस्तावावर चर्चा करायची आहे. दिल्लीच्या वटहुकुमावर आमचा पक्ष राज्यसभेत विरोध करेल. प्रथम रजनी पाटील यांना निलंबित केले. आता संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. तुम्ही याकडे कसे पाहता?  संजय सिंह यांना यासाठी निलंबित करण्यात आले; कारण, जेव्हा दिल्ली वटहुकुमावर राज्यसभेत चर्चा होईल तेव्हा संख्याबळ कमी असावे. राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे संख्याबळ कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही सरकारची रणनीती आहे. दिल्लीच्या नेतृत्वाने तुम्हाला ममता बॅनर्जींबाबत मवाळ भूमिका घेण्यास सांगितले आहे का?  मवाळ किंवा कठोर हा मुद्दा नाही. मी जे पाहतो तेच बोलतो. मला माहीत आहे की, नेतृत्वाला काय हवे आहे. डावे पक्ष आणि ममता बॅनर्जी यांना सोबत कसे घेणार? या विषयावर अजून वेगळी चर्चा झालेली नाही, जेव्हा होईल तेव्हा सांगू. दिल्ली काँग्रेस, पंजाब काँग्रेस आणि बंगालमध्येही अडचणी आहेत हे मला माहीत आहे. प. बंगालमध्ये आघाडी झाली आणि जागांचे वाटप झाले तर आपल्याला कळवू. ‘इंडिया’ समूहात अशी कोणती ताकद आहे, जी मोदी यांना पराभूत करेल? ताकद आहे म्हणून तर सत्ताधारी घाबरले आहेत. आमचा निशाणा बरोबर लागला आहे. राहुल गांधी यांच्या खटल्याबाबत काय होणार?  हे सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. त्यांच्यावर कोणताही विशिष्ट आरोप नाही. कटकारस्थान करून त्यांना अडकविण्यात आले आहे, हे सर्वांना माहीत आहे. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे व राहुल गांधी यातून बाहेर पडतील. पुन्हा एकदा संसदेच्या कामकाजात सहभागी होतील, अशी आशा आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसद