पदवीपूर्व विद्यार्थिनींना ग्रंथालयात प्रवेश नाही
By Admin | Updated: November 12, 2014 02:35 IST2014-11-12T02:35:45+5:302014-11-12T02:35:45+5:30
मुलींमुळे मुले आकर्षित होतात आणि गर्दी वाढते म्हणून आपल्या मुख्य गं्रथालयात पदवीपूर्व विद्यार्थिनींना परवानगी न देण्यावरून अलीगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) वादाच्या भोव:यात सापडले आह़े
पदवीपूर्व विद्यार्थिनींना ग्रंथालयात प्रवेश नाही
अलीगड : मुलींमुळे मुले आकर्षित होतात आणि गर्दी वाढते म्हणून आपल्या मुख्य गं्रथालयात पदवीपूर्व विद्यार्थिनींना परवानगी न देण्यावरून अलीगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) वादाच्या भोव:यात सापडले आह़े केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रलयाने ग्रंथालयातील मुलींसाठी असलेली प्रवेशबंदी हा मुलींचा अपमान असल्याचे सांगत याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्पष्टीकरण मागितले आह़े
दरम्यान पदवीपूर्व विद्यार्थिनींना ग्रंथालयात परवानगी न देण्याचा निर्णय लैंगिक भेदभावाच्या आधारावर घेतला गेला नसून जागेच्या तुटवडय़ामुळे घेण्यात आल्याचा खुलासा एएमयूने केला आह़े
अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे मौलाना आझाद हे मुख्य गं्रथालय आह़े मात्र पदवीपूर्व विद्यार्थिनींना या ग्रंथालयात प्रवेश नाही़
ग्रंथालयात मुली आल्या की मुले आकर्षित होतात आणि गं्रथालयात नेहमीपेक्षा अधिक गर्दी वाढते,असे विधान विद्यापीठाचे कुलगुरू जमीरुद्दीन शाह यांनी केल्याचे वृत्त मीडियाने दिले आह़े त्यांच्या या कथित विधानावर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असतांनाच खुद्द शाह यांनी मात्र मीडियातील वृत्त नाकारले आह़े विद्यापीठ परिसराबाहेर शिकणा:या पदवीपूर्व विद्यार्थिनींना मौलाना आझाद ग्रंथालयात प्रवेश नाही़ 196क् पासून ग्रंथालय सुरू झाल्यापासूनच ही प्रवेशबंदी
आह़े यात काहीही नवीन
नाही़ पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या विद्यार्थिनी आणि महिला संशोधनकत्र्याना या ग्रंथालयात येण्याची मुभा आह़े (वृत्तसंस्था)
च्अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूंचे विधान महिलांना व्यथित करणारेच नाही तर संताप आणणारेही आहे, असे मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.