शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

मंत्रिमंडळ ठरवताना अनपेक्षित डावपेच

By admin | Updated: May 27, 2014 05:39 IST

आधीपासून मिळालेल्या संकेतांनुसार वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या भाजपाच्या दोन ज्येष्ठतम नेत्यांना मोदींनी मंत्रिमंडळात घेतले नाही

नवी दिल्ली : आधीपासून मिळालेल्या संकेतांनुसार वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या भाजपाच्या दोन ज्येष्ठतम नेत्यांना मोदींनी मंत्रिमंडळात घेतले नाही. तसेच इंदूरमधून आठ वेळा निवडून आलेल्या सुमित्रा महाजन व झारखंडचे आदिवासी नेते करिया मुंडा यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. या दोघांपैकी एकाला लोकसभा अध्यक्षपद दिले जाईल, असे समजते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षाची भूमिमा खास करून टीव्ही वाहिन्यांवर दमदारपणे मांडणार्‍या प्रकाश जावडेकर व निर्मला सितारामन या भाजपाच्या दोन प्रवक्त्यांना, संसदेचे सदस्य नसूनही, मंत्रिपदाची बक्षिशी देण्यात आली आहे. या दोघांना पुढील सहा महिन्यांत लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून आणावे लागेल. अमित शहा व मुख्तार अब्बास नक्वी आणि राजीव प्रताप रुडी या दोन सरचिटणीसांची मंत्रिमंडळातील अनुपस्थितीही लक्षणीय आहे. पण महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी संघटनेची मोठी जबाबदारी सोपविण्यासाठी त्यांना मोकळे ठेवण्यात आल्याचे भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.