ज्ञानप्रबोधिनीजवळ बेवारस मृतदेह
By Admin | Updated: September 4, 2015 01:08 IST2015-09-04T01:08:31+5:302015-09-04T01:08:31+5:30

ज्ञानप्रबोधिनीजवळ बेवारस मृतदेह
>पुणे : सदाशिव पेठेमधील ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक बेवारस मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास त्यांना ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर साधारणपणे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष बेशुध्दावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्याला उपचारांपुर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.