शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 3:58 AM

भाजपच्या झंझावातामध्ये पंजाब, राजस्थान या कॉँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

- विश्वास खोड भाजपच्या झंझावातामध्ये पंजाब, राजस्थान या कॉँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अंतर्गत कुरबुरी उफाळल्या आहेत. कर्नाटकात जनता दलाच्या (सेक्युलर) मदतीने सत्ता मिळविलेल्या कॉँग्रेसने शुक्रवारी सकाळी तातडीने बोलाविलेल्या बैठकीनंतर राज्यातील सत्ता अबाधित राहील, असा दावा केला आहे. छत्तीसगडमध्ये ५ महिन्यांपूर्वी भाजपची सत्ता असल्याने आणि या पक्षाच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याने कॉँग्रेसजनांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तर मध्य प्रदेशात आमचे आमदार फुटणार नाहीत, अशी ग्वाही दिग्विजयसिंह यांना द्यावी लागली.सिद्धू - अमरिंदर सिंग यांच्यात वादपंजाबमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात आघाडी उघडली. आपण लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी आज सांगितले. कॉँग्रेसच्या पराभवाचे खापर सिद्धू यांच्यावर फोडले असून त्यांचा उल्लेख निष्क्रिय मंत्री असा केला आहे. भटिंडा आणि गुरुदासपूरमधील हार सिद्धू यांच्या बेताल वक्तव्यांमुळे झाली, असा त्यांचा दावा आहे.पायलट - गहलोत कुरबुरराजस्थानातील अंतर्गत कुरबुरी उफाळल्या आहेत. मुख्यमंत्री पदासाठी विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खूप रस्सीखेच झाली होती. तडफदार युवक असलेल्या पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. गेल्या ५ महिन्यांतील त्यांच्यातील कुरबुरी कॉँग्रेसला लोकसभा निवडणुकीत महागात पडल्या. सर्व २५ जागांवर पक्षाला धूळ चारत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. त्यातच त्यांचा मुलगा वैभव गहलोत याचाही पराभव झाला. त्यामुळे राजकीयदृष्ट्या दुर्बल झालेल्या गहलोत यांना पक्षांतर्गत विरोध वाढू शकतो.>आमदार आमच्यासोबतच -दिग्विजयसिंहदरम्यान, मध्य प्रदेशातील सरकार पाडले जाण्याबद्दलच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप केला. आमची सत्ता राज्यात असणे भाजपला सहन होत नाही. आमदार फोडले जात असले तरी आम्हाला पाठिंबा देणारे आणि आमचे स्वत:चे आमदार यांच्याबद्दल संपूर्ण विश्वास आहे, असा दावा त्यांनी केला. प्रज्ञासिंह यांच्याकडून या ज्येष्ठ नेत्याला हार पत्करावी लागली.>छत्तीसगडमध्ये धास्तीभाजपने छत्तीसगडमध्ये ११पैकी ९ जागांवर विजयश्री खेचून आणली. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र कॉँग्रेसने मोठा विजय मिळविला. ९० पैकी ६८ जागा जिंकल्या. भाजपला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवातून धडा घेत भाजपने एकाही विद्यमान खासदाराला निवडणुकीसाठी संधी दिली नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपला ३२.९७ टक्के मते मिळाली. ती लोकसभा निवडणुकीत वाढून ५०.७० टक्क्यांवर गेली. कॉँग्रेसला विधानसभा निवडणुकीत ४३.४ टक्के मते मिळाली होती, ती या निवडणुकीत ४० टक्क्यांवर आली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत प्रथमच २ जागा जिंकूनही कॉँग्रेसमध्ये मरगळलेपणा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९