शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्येही रंगतेय काका-पुतण्याचे राजकारण, चिराग अन् पशुपती पारस येणार आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 10:16 IST

भाजपच्या नेतृत्वाने आधी नितीश कुमार व आता चिराग पासवान यांना एनडीएमध्ये सहभागी केले.

- राजेश शेगाेकारपाटणा : बिहारच्या राजकीय कुरूक्षेत्रावरही काका-पुतण्यामधील वर्चस्वाचे, कुरघाेडीचे राजकारण रंगत आहे. पशुपती पारस अन् चिराग पासवान या काका-पुतण्याच्या जाेडीला ज्यांचा राजकीय विचारांचा वारसा मिळाला, त्या दिवंगत रामविलास पासवान यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हाजीपूर मतदारसंघात हे काका-पुतणे समाेरासमाेर उभे ठाकणार आहेत.

भाजपच्या नेतृत्वाने आधी नितीश कुमार व आता चिराग पासवान यांना एनडीएमध्ये सहभागी केले. चिराग यांच्या लोकजनशक्ती पार्टीला प्राधान्य देत एनडीएच्या जागा वाटपात यापूर्वी घटक पक्ष राष्ट्रीय लोक जनशक्तीचे प्रमुख, केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या वाट्याला एकही जागा दिली नाही. पारस यांच्या सहा खासदारांचा केंद्रात भाजपला पाठिंबा हाेता हे विशेष! आता पारस हे महागठबंधनच्या संपर्कात आहेत. त्यांना हाजीपूर येथून उमेदवारीची शक्यता आहे. असे झाल्यास हाजीपूरमध्ये पासवान कुटुंबाची लढाई चुरशीची हाेईल, शिवाय रामविलास यांचा पुढील वारसा काेणाच्या हातात राहील, याचाही निर्णय हाेईल.

चिराग पासवान यांच्या हाती कार्डचिराग यांच्या पक्षाला वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या पाच दिल्या आहेत. हाजीपूर मतदारसंघात स्वत: चिराग लढणार आहेत. समस्तीपूरचे खा. राजकुमार राज, वैशालीच्या खा. वीणा देवी व खगरियाचे खासदार मेहबूब अली कैसर हे पारस यांच्या पक्षात हाेते. मात्र, कैसर हे एनडीएचे उमेदवार हाेऊ शकतात.

लालुंचे घोषणा कुशवाहा कार्डमहागठबंधनचे जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यांनी चारही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या. लालू यांनी औरंगाबादमधून अभय कुशवाहा, नवादातून श्रवण कुशवाहा यांना उमेदवारी देऊन भाजपच्या कुशवाहा कार्डला धक्का दिला. गयामध्ये माजी मंत्री कुमार सर्वजित, जमुईमध्ये अर्चना रविदास यांना उमेदवारी घोषित केली आहे. 

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४