ुं्नबाजारभाव

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:32+5:302015-07-13T01:06:32+5:30

भाज्यांपाठोपाठ कडधान्येही कडाडली

Unbannerb | ुं्नबाजारभाव

ुं्नबाजारभाव

ज्यांपाठोपाठ कडधान्येही कडाडली
तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ९० रुपये, चणाडाळ ८० रुपये, उडीद डाळ १३० रुपये प्रती किलो
पणजी : दिवसेंदिवस भाजी बाजारपेठेत वाढलेल्या दरांमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना आता कडधान्नेदेखील वाढलेल्या दरात खरेदी करावी लागत आहेत. कडधान्यांच्या उत्पादनात घट झाल्याने त्यांची आवक मंदावली असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहकांना फटका बसत आहे.
बाजारपेठेत सध्या तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ९० रुपये, चणाडाळ ८० रुपये, उडीद डाळ १३० रुपये प्रती किलो या दराने विकली जात आहे. टोमॅटोचे दरदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेले असून ३० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. कारली, भेंडी, चिटकी आणि बीट प्रत्येकी ४० रुपये किलो दराने विकली जात आहे. मेथी व कोथिंबीर प्रत्येकी १०, तर पालक ५ रुपयांना एक जुडी विकली जात आहे. ढब्बू मिरची, हिरवी मिरची आणि गाजर देखील प्रत्येकी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.
विक्रे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टोमॅटोच्या पुरवठ्यात घट झाल्याकारणाने त्याचा दर वाढलेला आहे. बेळगाव परिसरात भाज्यांसाठी पूरक अशा प्रमाणात पाऊस न झाल्यास भाज्यांच्या पुरवठ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवलेली आहे.
भाजी आणि कडधान्यांप्रमाणे मसाल्याच्या पदार्थांचे दरदेखील वाढलेले आहेत. आठवड्याभरापूर्वी भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर होते. मात्र, हे दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढत्या दरामुळे खिशाला बसणार्‍या फटक्याच्या विचार करता ग्राहक हैराण झालेले आहेत. खास करून बजेट कसे सांभाळावे, असा गृहिणींना प्रश्न पडलेला आहे.

पावसाळी भाज्या/ फळे बाजारपेठेत दाखल
भाजी बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात पावसात उगवणार्‍या भाज्या दाखल झालेल्या आहेत. आळू, गावठी काकडी, ताळखिळा अशा भाज्या विक्र ीस ठेवलेल्या दिसतात. आळू वीस रुपये दराने विकले जात आहे, तर काकडी वीस रुपयांना तीन या दराने विकली जात आहे. घोसाळी २५ रुपये एक या दराने विकले जात आहे.

Web Title: Unbannerb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.