शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृतपणे कागदपत्रांच्या प्रती काढून घेणे म्हणजे चोरीच - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 01:17 IST

बीटी कॉर्पोरेशनने ही प्रत जोडणाऱ्या वकिलांकडे ती कोठून मिळवली, याची माहिती मागितली. मात्र, वकिलांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : एखाद्याच्या ताब्यातील कागदपत्रे अनधिकृतपणे घेणे आणि त्याच्या प्रती काढून घेणे, हा चोरीचा गुन्हा होऊ शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.बीटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दाखल केलेल्या एका तक्रारीच्या बाबतीत हा निकाल देण्यात आला. या प्रकरणात त्यांच्याच कार्यालयाशी संबंधित आॅडिट रिपोर्टची प्रत जोडण्यात आली होती.या आॅडिट रिपोर्टमध्ये कंपनीची महत्त्वाची माहिती असल्याने त्याच्या फक्त सहा प्रती तयार करण्यात आल्या होत्या. या प्रती फक्त कंपनीच्या महत्त्वाच्या लोकांना नावानिशी देण्यात आल्या होत्या. यापैकी एका संचालकाच्या अहवालाची प्रत न्यायालयात देण्यात आली होती.बीटी कॉर्पोरेशनने ही प्रत जोडणाऱ्या वकिलांकडे ती कोठून मिळवली, याची माहिती मागितली. मात्र, वकिलांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे यात अहवालाची चोरी करून प्रत काढल्याचा व ती चोरीची मालमत्ता स्वीकारल्याचा गुन्हा दाखल केला.प्रकरण उच्च न्यायालयात गेले तेव्हा सर्व मूळ कागदपत्रे कंपनीच्याच ताब्यात आहेत आणि कागदपत्रांतील माहिती घेऊन जाणे, ही मालमत्तेची चोरी होऊ शकत नाही, म्हणून तो गुन्हा न्यायालयाने रद्द केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्या. आर. भानुमती व न्या. सुभाष रेड्डी यांनी उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला.प्रती काढण्यामागे अप्रामाणिक हेतूकागदपत्रांतील लिखाण ही कंपनीची मालमत्ता होती. त्याच्या प्रती काढण्यासाठी काही काळासाठी कागदपत्रे अनधिकृतपणे घेऊन जाऊन प्रती काढल्यास ती कंपनीच्या मालमत्तेची चोरी ठरते. या प्रती काढल्याने कंपनीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रती काढण्यामागे अप्रामाणिक हेतू होता. मूळ प्रती जरी कंपनीच्या ताब्यात असल्या तरी त्यातील मजकुराची चोरी झाल्याने तो गुन्हा होतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय