शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

अनधिकृत होर्डिंगकडे पालिकेचे दुर्लक्ष राजकीय दबावामुळे दिरंगाई : नेत्यांचे उद्देश साध्य झाल्यावर होते कारवाई

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिका प्रशासन राजकीय दबावामुळे अनधिकृत होर्डिंगकडे दुर्लक्ष करत आहे. शहरात अनेक ठिकाणी होर्डिंगबाजी सुरूच आहे. नेते व पदाधिकार्‍यांचा होर्डिंगचा उद्देश साध्य झाल्यानंतर प्रशासन कारवाई करत आहे.

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिका प्रशासन राजकीय दबावामुळे अनधिकृत होर्डिंगकडे दुर्लक्ष करत आहे. शहरात अनेक ठिकाणी होर्डिंगबाजी सुरूच आहे. नेते व पदाधिकार्‍यांचा होर्डिंगचा उद्देश साध्य झाल्यानंतर प्रशासन कारवाई करत आहे.
अनधिकृत होर्डिंगविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना दिले आहेत. परंतु यानंतरही नवी मुंबईमध्ये होर्डिंजबाजी सुरूच आहे. शुक्रवारी बिल्डर्स असोसिएशनच्या प्रदर्शनामुळे वाशी परिसरास अनधिकृत होर्डिंगचा विळखा पडला होता. आसाम भवनजवळ दाटीवाटीने होर्डिंग लावण्यात आले होते. विजेच्या खांबांवरही बॅनर लावण्यात आले होते. याविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पालिकेचे विभाग अधिकारी राजेंद्र चौघुले व इतर अधिकारी या ठिकाणी असतानाही सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली होती. कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी होर्डिंग हटविण्याचे काम करण्यात आले.
शहरात रेल्वे स्टेशन, महत्त्वाचे चौक, प्रत्येक प्रभागामध्ये मतदार नोंदणीपासून विविध कार्यक्रमांचे होर्डिंग झळकत आहेत. परंतु त्यावर काहीही कारवाई केली जात नाही. विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्यापासून व्यावसायिक जाहिराती फुकटात लावल्या जात आहेत. पालिकेचे अधिकारी दोन ते तीन दिवस या होर्डिंगना अभय देवून नंतर कारवाई करत आहेत. राजकीय दबावामुळेच कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चौकट
हेल्पलाइनवर २२ तक्रारी
महापालिकेने अनधिकृत होर्डिंगविषयी कारवाई करण्यासाठी १८००२२२३०९ व १८००२२२३१० हे टोल फ्री नंबर सुरू केले आहेत. ४ डिसेंबरपासून या नंबरवर २२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे हे हेल्पलाइन नंबर नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पालिकेने योग्य जाहिरातच केलेली नाही.

फोटो
१२होर्डींग, वाशीमध्ये मालमत्ता प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी करण्यात आलेली कारवाई