उमरेड... बाजार समिती
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:12+5:302015-02-13T00:38:12+5:30
खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीचे निर्देश

उमरेड... बाजार समिती
ख ेदी विक्री समितीच्या निवडणुकीचे निर्देशउमरेड : स्थानिक खरेदी विक्री समितीचे अप्रशासकीय प्रशासक मंडळाचे अधिकार काढून घेत प्रशासकाची नियुक्ती करीत असल्याचे पत्र सहायक निबंधकांनी (सहकारी संस्था) मुख्य प्रशासक विलास दरणे यांना दिले. या पत्रातच नियुक्त प्रशासकाने संस्थेची निवडणूक घ्यावी, असे निर्देश दिले आहे. सदर अप्रशासकीय मंडळात मुख्य प्रशासक विलास दरणे, सदस्य चंद्रभान महल्ले, नारायण तोडासे, चंद्रशेखर ठवकर, नामदेव लाडेकर यांचा समावेश होता. सहायक निबंधक प्रकाश भजनी यांनी शासकीय प्रशासक अतुल वानखडे (श्रेणी अधिकारी - १) यांची नियुक्ती करून निवडणूक घेण्याची व्यवस्था करण्याचे लेखी पत्र निर्गमित केले. सदर बरखास्त अप्रशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती मागील काँग्रेस सरकारने २ जानेवारी २०१२ रोजी केली होती. नवीन भाजप-शिवसेना युती सरकार लोकशाही प्रक्रियेने निवडणूक घेतात की अप्रशासकीय प्रशासकाची नियुक्ती करतात, याकडे उमरेडकरांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)