नावामुळे उमर खालिद लक्ष्य - उमरचे वडिल

By Admin | Updated: February 19, 2016 11:01 IST2016-02-19T10:38:53+5:302016-02-19T11:01:58+5:30

उमर खालिदला त्याच्या नावामुळे तो मुस्लिम असल्यामुळे लक्ष्य केले जात आहे असा आरोप उमर खालिदचे वडिल सयैद कासिन इलियास यांनी केला आहे.

Umar Khalid target for the name - Umar's elder | नावामुळे उमर खालिद लक्ष्य - उमरचे वडिल

नावामुळे उमर खालिद लक्ष्य - उमरचे वडिल

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - उमर खालिदला त्याच्या नावामुळे तो मुस्लिम असल्यामुळे लक्ष्य केले जात आहे असा आरोप उमर खालिदचे वडिल सयैद कासिन इलियास यांनी केला आहे. उमर खालिदवर जवाहर लाल नेहरु विद्यापीठात देश विरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. 
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, न्यायालयाने या आरोपांवर निकाल द्यावा, मिडीला ट्रायल घेऊन सुनावणी करु नये असे उमर खालिदचे पिता सयैद इलियास म्हणाले. सिमीशी संबंधित माझा जो भूतकाळ तो तुम्ही उमर खालिदशी कसा जोडू शकता ? मी १९८५ मध्ये सिमी सोडली उमरचा जन्म त्यानंतर झाला असे त्याच्या वडिलांनी सांगितले. 
जेएनयूचे प्रकरण चिघळल्यापासून उमर खालिद फरार आहे. उमर कुठे आहे मला माहिती नाही, पण मी त्याला न्यायालयाला शरण जाण्याचे आवाहन करतो असे सयैद इलियास यांनी सांगितले. उमर उच्च शिक्षित कुटुंबातील असून, जेएनयूमध्ये पीचडी करत आहे. उमरची बहिण अमेरिकाला असते. 
 


Web Title: Umar Khalid target for the name - Umar's elder