उज्ज्वल निकम सहावे पद्मश्री पुरस्कारार्थी सन्मान : उद्योग, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश
By Admin | Updated: January 26, 2016 00:04 IST2016-01-26T00:04:44+5:302016-01-26T00:04:44+5:30
जळगाव : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले ते जळगाव जिल्ातील सहावे मान्यवर आहेत. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर, जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन, समाजसेविका नीलिमा मिश्रा व शीतल महाजन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

उज्ज्वल निकम सहावे पद्मश्री पुरस्कारार्थी सन्मान : उद्योग, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश
ज गाव : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले ते जळगाव जिल्ातील सहावे मान्यवर आहेत. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर, जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन, समाजसेविका नीलिमा मिश्रा व शीतल महाजन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.भालचंद्र नेमाडेजळगाव जिल्ातील यावल तालुक्यातील सांगवी येथील मूळचे रहिवासी भालचंद्र नेमाडे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कादंबरीकार, कविता, समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांना १९९१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तर २०१४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कोसला, बिढार, झूल, जरिला, हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ा कादंबर्या आणि मेलडी, देखणी हे कवितासंग्रह वगैरे त्यांचे गाजलेले साहित्य आहे.ना.धों.महानोरमूळचे औरंगाबाद जिल्ातील पळसखेडे येथील रहिवासी असलेले व सध्या जळगाव शहरात स्थायिक झालेले प्रसिद्ध कवी ना.धों.महानोर यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एक होता विदूषक, जैत रे जैत, सर्जा, मुक्ता या चित्रपटातील त्यांची गीते गाजली होती. तसेच रानातल्या कविता, प्रार्थना दयाघना, वहाटूळ, अजिंठा, जगाला प्रेम अर्पावे हे कविता संग्रह त्यांचे गाजलेले आहेत. १९७८ साली त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.भवरलाल जैनजळगाव जिल्ातील वाकोद येथील रहिवासी भंवरलाल जैन यांना २००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील, जळगाव रत्न, भारत कृषक समाजाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.नीलिमा मिश्रासामाजिक क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील नीलिमा मिश्रा यांना २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बचत गटांना प्रोत्साहन दिल्याबद्दल २०११ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.