उज्जैनमध्ये तुफान वादळात 6 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

By Admin | Updated: May 5, 2016 18:42 IST2016-05-05T18:42:28+5:302016-05-05T18:42:28+5:30

ज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तुफान पाऊस पडला आहे. वादळी वा-यासह पडलेल्या पावसात आतापर्यंत 6 जणांनी जीव गमावला आहे.

In Ujjain storm storm killed 6 people, more than 20 injured | उज्जैनमध्ये तुफान वादळात 6 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

उज्जैनमध्ये तुफान वादळात 6 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 5- उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तुफान पाऊस पडला आहे. वादळी वा-यासह पडलेल्या पावसात आतापर्यंत 6 जणांनी जीव गमावला आहे. उज्जैनमध्ये आलेल्या वादळी वा-यासह पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
 या वादळी वा-यात एका साधूसोबत 3 महिलांना जीव गमवावा लागला आहे. तर 20 हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सिंहस्थसाठी शुक्रवारी जवळपास 25 लाख लोक येणार आहेत. त्यामुळे एवढ्या लोकांचं नियोजन करण्याचं प्रशासनापुढे आव्हान आहे. 
दुपारपर्यंत वातावरण ठीक असताना संध्याकाळी 4 नंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या अचानक कोसळलेल्या पावसामुळे प्रशासनाचं पुरतं नियोजन ढेपाळलं आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यानं बत्ती गुल झाली आहे. उज्जैनमध्ये पंचक्रोशीतून येण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था सरकारला करावी लागणार आहे. 
 

Web Title: In Ujjain storm storm killed 6 people, more than 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.