शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:20 IST

Ujjain Accident: आग विझवण्यासाठी जात असलेल्या एका अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले. यात दोन वर्षाच्या मुलासह त्याच्या बापाचा जागीच मृत्यू झाला. 

Accident News: आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाकडे निघालेल्या एका अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. 12 जून रोजी दुपारी हा अपघात झाला. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील बडनगरमध्ये झालेल्या या भीषण अपघातात बापलेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बडनगर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या कार्यालयात आग लागल्याचा माहिती कॉल करून देण्यात आली. बडनगर महामार्गावरील बरगुंडसरी रोडवर ही आग लागली होती. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे वाहन त्या दिशेने निघाले होते. 

दुचाकीला धडक, गाडी उलटली अन् पाच जण चिरडले

अग्निशामक दलाची गाडी वेगाने घटनास्थळाकडे जात होती. त्याचवेळी रस्त्यात अचानक दुचाकी आली. त्याला अग्निशामक दलाची गाडी धडकली आणि उलटली. त्यानंतर गाडी घासत दूरपर्यंत गेली. यात पाच जण गाडीखाली चिरडले गेले. 

दोन वर्षाचा मुलगा आणि बापाचा मृत्यू, लेक वाचली

अग्निशामक दलाच्या गाडीने चिरडल्याने एका दोन वर्षाच्या मुलासह बाप जागीच ठार झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आवेश (वय २) त्याचे वडील जितेंद्र सिंह (वय ५०), सुजल भुरालाल (वय १६, रा. पीरझालर) यांचा मृत्यू झाला. जितेंद्र सिंह यांची मुलगी तनिषा (वय ३) ही या अपघातात जखमी झाली आहे. 

वाचा >>दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा!

संतोष आणि उजाला अशी इतर दोन जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बडनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी अग्निशामक दलाच्या वाहनाचा चालक सतीश सोळंकी याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशFire Brigadeअग्निशमन दलDeathमृत्यू