उजनीचा उपयुक्त साठा कमी होतोय लवकरच मृतसाठ्यात रुपांतर होणार

By Admin | Updated: May 11, 2014 00:52 IST2014-05-09T19:26:57+5:302014-05-11T00:52:19+5:30

करमाळा : उजनी धरणातील पाणीसाठा कमी कमी होऊ लागलेला असून, धरणात उपयुक्त पाणी ३.२५ टक्के असून, येत्या आठ दिवसात उजनी उपयुक्त साठ्यामधून मृत पाणीसाठ्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Ujani's useful resources are reduced soon, it will soon be converted into dead bodies | उजनीचा उपयुक्त साठा कमी होतोय लवकरच मृतसाठ्यात रुपांतर होणार

उजनीचा उपयुक्त साठा कमी होतोय लवकरच मृतसाठ्यात रुपांतर होणार

करमाळा : उजनी धरणातील पाणीसाठा कमी कमी होऊ लागलेला असून, धरणात उपयुक्त पाणी ३.२५ टक्के असून, येत्या आठ दिवसात उजनी उपयुक्त साठ्यामधून मृत पाणीसाठ्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
करमाळा तालुक्याच्या पायथ्याला असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी कमी होत चालला आहे. उजनी धरणात पाणी पातळी ४९१.२९२ मीटर असून एकूण साठा १८५५.२४ द.ल.घ.मी. आहे.उपयुक्त साठा ५२.४३ द.ल.घ.मी इतका आहे. ११-१२ या वर्षात धरणात वजा ३ टक्के म्हणजेच ६२ टी.एम.सी पाणीसाठा शिल्लक होता तर गतवर्षी २०१२-१३ मध्ये धरणात वजा ३४.३८ टक्के म्हणजे ४५ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चालू वर्षी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणात १२३ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध झाला होता. करमाळा तालुक्यातील जिंतीपासून ते कंदरपर्यंत तब्बल २९ गावांच्या काठावर पसरलेल्या उजनी धरणातील पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी कमी होत चालल्याने शेतकरी आपापल्या विद्युत मोटारी धरण पात्रात नेऊ लागले असून पाईप,केबल वाढविण्याची घाई चालली आहे.पावसाळा सुरू होण्यास महिनाभर कालावधी आहे.उन्हाळी पिके वाचविण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील शेतकरी आता पाण्यासाठी चार्‍याही खोदाई करू लागला आहे. 

Web Title: Ujani's useful resources are reduced soon, it will soon be converted into dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.