शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:49 IST

मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.

आधार कार्डसंदर्भात एक मोठी बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने 7-17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाली असून, ती एक वर्षासाठी उपलब्ध असेल. यामुळे सुमारे 6 कोटी मुलांना फायदा होईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.

कोणत्या वयात होते बायोमेट्रिक? - पाच वर्षांखालील मुलांची आधार नोंदणी त्यांचे छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्म प्रमाणपत्राद्वारे होते. या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, कारण ते पूर्णपणे विकसित झालेले नसतात. यामुळे, विद्यमान नियमांनुसार, मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आधारमध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन आणि छायाचित्र अपडेट अनिवार्य आहे. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU-1) म्हटले जाते.

15 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक -तसेच, 15 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे, ज्याला दुसरा MBU म्हणतात. 5-7 आणि 15-17 वर्षे वयोगटात केलेले हे अपडेट आता मोफत असतील. यापूर्वी, या वयोगटाबाहेर प्रत्येक MBU साठी 125 रुपये शुल्क आकारले जात होते. नव्या निर्णयामुळे 5 ते 17 वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Waives Aadhaar Update Fee for Children; 6 Crore Benefit

Web Summary : The Indian government has waived Aadhaar biometric update fees for children aged 7-17 until October 2025. This benefits approximately 6 crore children, simplifying access to education, scholarships, and direct benefit transfers. Updates are required at ages 5 and 15.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकार