शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आता तुमचा चेहरा बनणार आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 16:41 IST

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे.

नवी दिल्ली- युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी ‘आधार’ क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ देणार असल्याची घोषणा सरकारनं केली होती.यामुळे आपला ‘आधार’ क्रमांक न उघड करता ‘व्हर्च्युअल आयडी’ क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. ‘व्हर्च्युअल आयडी’ कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला 16 अंकी आकडा असेल. त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र, अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना ‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करून घेता येईल. हा ‘व्हर्च्युअल आयडी’ एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ घ्यावा लागेल.

1 जूनपासून नवी सोय‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व ‘आधार’ संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल. थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAdhar Cardआधार कार्ड