शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

UGC PhD Rules: 4 वर्षांच्या ग्रॅज्युएशननंतर विद्यार्थ्यांना थेट Phd करता येणार, यूजीसी अध्यक्षांची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 21:01 IST

UGC PhD Rules: नवीन अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू राहील.

UGC PhD Rules: नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे, पीएचडीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत काळजी करण्याची गरज नाही. पीएचडीसंदर्भातील महत्त्वाची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आली आहे. 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्याला थेट पीएचडी करता येणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी बुधवारी ही महत्वाची माहिती दिली. 

यूजीसीच्या अध्यक्षांनी म्हटले की, 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल. तसेच, हा नवीन अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बंद केला जाणार नाही. UGC दीर्घकाळापासून पदवीपूर्व कार्यक्रमांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क तयार करण्याच्या विचारात होते.

UGC FYUP जारीUGC ने जारी केलेला नवीन अभ्यासक्रम NEP 2020 वर आधारित आहे. याअंतर्गत नियमांमध्ये लवचिकता येणार असून विद्यार्थ्यांनाही पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहेत. ज्याअंतर्गत आता चार वर्षांचा पदवीपूर्व शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी करता येणार आहे. त्यांना पदव्युत्तर पदवी कार्यक्रमात प्रवेश घेण्याची गरज नाही. चार वर्षांची पदवी उत्तीर्ण करणारा कोणताही विद्यार्थी थेट पीएच.डी.साठी पात्र असेल.

4 वर्षांच्या पदवीचे फायदेदेशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पुढील सत्रापासून 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. सर्व केंद्रीय विद्यापीठांसह बहुतेक राज्यस्तरीय आणि खाजगी विद्यापीठे देखील 4 वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम देतात. याशिवाय देशभरातील अनेक डीम्ड युनिव्हर्सिटी देखील हा 4 वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम राबविण्यास संमती देत ​​आहेत. पदवीचे 4 वर्षे पूर्ण झाल्यावर UG ऑनर्स पदवी प्रदान केली जाईल.

टॅग्स :Educationशिक्षण