शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 10:46 IST

समुपदेशन रद्द करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने दिला नकार .

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ‘नीट-यूजी’ २०२४ नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी जाेर धरत असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ‘नीट’ परीक्षेबाबतच्या घटना काही ठराविक प्रदेशापुरत्या मर्यादित असून लाखाे विद्यार्थ्यांनी याेग्य प्रकारे परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना फटका बसायला नकाे, अशी भूमिका प्रधान यांनी स्पष्ट केली. तसेच ‘यूजीसी-नेट’ परीक्षेचे पेपर डार्कनेटवर फुटले हाेते. त्यामुळेच परीक्षा रद्द करण्यात आली, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.दरम्यान, ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षा रद्द करा आणि अनियमिततेची चौकशी करा, या मागण्या करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार, ‘एनटीए’ आणि इतरांकडून उत्तर मागितले. 

पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र जारीएनटीएने नीट-यूजी २०२४ पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. वेळेच्या कमतरतेमुळे सवलतीचे गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. परंतु पुन्हा परीक्षा द्यायची की नाही किंवा वाढीव गुण काढून टाकल्यानंतर शिल्लक राहिलेल्या गुणांसह पुढे जायचे हे उमेदवारांवर सोडण्यात आले आहे.  नीट पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. २३ जून रोजी दुपारी २ ते ५.२० या वेळेत ही परीक्षा होणार आहे. तिचा निकाल ३० जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मानसिकदृष्ट्या खचले आहेत आणि सरकार चालवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. ते रशिया - युक्रेन युद्ध थांबवतील, पण पेपरफुटी थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत? भाजप आणि त्याच्या मातृ संघटनेशी संबंधित लोकांनी शैक्षणिक संस्था काबीज केल्या आहेत. ही परिस्थिती बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही. संसदेच्या आगामी अधिवेशनात विरोधी पक्ष पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करील.- राहुल गांधी, काँग्रेस नेते

समुपदेशन रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. नीट-यूजी २०२४ संबंधी इतर प्रलंबित प्रकरणांसह याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी केली जाईल, असे सांगत खंडपीठाने समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देत नसल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण