शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वर्षभरापासून पाळत ठेवलेल्या जैशच्या दहशतवाद्याला संपवलं; सुरक्षा दलांनी तिघांना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:21 IST

जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर येथे सुरु असलेल्या चकमकीत जैश-ए-मौहम्मदच्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे.

Udhampur Encounter: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मौहम्मदच्या चार दहशतवाद्यांना घेरलं होतं. भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम 'ऑपरेशन बिहाली' राबवत असतानाच एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. खराब हवामानामुळे या कारवाईत अनेक अडचणी येत होत्या. मात्र सुरक्षा दलांनी वर्षभरापासून लक्ष ठेवलेल्या एका दहशतवाद्याला अखेर ठार केले.

उधमपूर चकमकीत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड येथे सकाळी ही चकमक सुरू झाली. ऑपरेशन बिहालीमध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे. ही कारवाई अजूनही सुरू आहे,अशी माहिती लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने दिली. विशेष गुप्त माहितीच्या आधारे, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी बसंतगडच्या बिहाली भागात संयुक्त कारवाई सुरू केली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे.

गेल्या एक वर्षापासून या चार दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. अचूक माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी बसंतगडच्या दुर्गम बिहाली भागात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध पथकाने शोध मोहीम सुरू केली. त्याच वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. या भागात अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंकडून थांबून थांबून गोळीबार सुरू आहे.

"सकाळी ८:३० च्या सुमारास दहशतवादी तिथे सापडले. आम्ही गेल्या एक वर्षापासून यांचा शोध घेत होतो धुके असूनही, शोध मोहीम सुरू आहे आणि हवामान सुधारल्यानंतरच खरी परिस्थिती कळेल," असे जम्मू रेंजचे पोलिस महानिरीक्षक भीम सेन तुती यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे सदस्य आहेत. लष्कराच्या पॅरा कमांडोंच्या नेतृत्वाखालील संयुक्त शोध पथकाला ते करूर नाल्याजवळ लपलेले आढळले. 'ऑपरेशन बिहाली' असे सांकेतिक नाव असलेले हे ऑपरेशन काश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रेआधी सुरु करण्यात आलं आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान