..तर सेनेच्या बाहेरून पाठिंब्यानेही स्थिर सरकार उद्धव ठाकरेंना टोला : खडसे यांच्याकडून लगोलग समन्वयवादी भूमिका

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30

नाशिक : राज्यात स्थिर सरकार हवे म्हणून भाजपाला पाठिंबा दिल्याचे सांगणार्‍या उद्धव ठाकरे यांना भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी नाशिकमध्ये टोला लगावला. सरकार स्थिर ठेवायचे एवढाच हेतु असेल तर बाहेरून पाठिंबा देऊनही ते साध्य करता येते, त्यासाठी सरकारमध्ये सामील होण्याची गरज काय असा प्रश्न खडसे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray's support for outside support from outsiders: Pranab Mukherjee | ..तर सेनेच्या बाहेरून पाठिंब्यानेही स्थिर सरकार उद्धव ठाकरेंना टोला : खडसे यांच्याकडून लगोलग समन्वयवादी भूमिका

..तर सेनेच्या बाहेरून पाठिंब्यानेही स्थिर सरकार उद्धव ठाकरेंना टोला : खडसे यांच्याकडून लगोलग समन्वयवादी भूमिका

शिक : राज्यात स्थिर सरकार हवे म्हणून भाजपाला पाठिंबा दिल्याचे सांगणार्‍या उद्धव ठाकरे यांना भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी नाशिकमध्ये टोला लगावला. सरकार स्थिर ठेवायचे एवढाच हेतु असेल तर बाहेरून पाठिंबा देऊनही ते साध्य करता येते, त्यासाठी सरकारमध्ये सामील होण्याची गरज काय असा प्रश्न खडसे यांनी केला आहे.
राज्यात भाजपाबरोबर सत्तेत स्थापन होऊनही सेना सरकारवर टीका करीत आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेची पूर्ण सत्ता नाही. आम्ही केवळ सरकार स्थिर केले आहे, असे सांगतानाच त्यांनी मराठी माणसावर अन्याय केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला. खडसे यांचे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी याबाबत विचारल्यानंतर खडसे यांनी शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी आहे. त्यांना केवळ सरकारच स्थिर करायचे असेल तर मंत्रिमंडळात सहभागी न होताही बाहेरून पाठिंबा देऊन सरकार स्थिर करता येते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात टक्केवारीच्या केलेल्या कथित विधानाचाही खडसे यांनी खिल्ली उडविली. कदम यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, असे सांगून कदम यांच्यामुळे मनोरंजन होत असल्याचे सांगितले. अर्थात, त्याचवेळी त्यांनी राज्यात सत्तेत असताना असे बोलणे योग्य नसल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री सध्या विदेश दौर्‍यावर गेले असून, ते परतल्यानंतर समन्वयाने तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नेण्याच्या विषयावरही त्यांनी या विषयाचे राजकारण केले जात असल्याचे नमूद केले. महाराष्ट्राच्या हक्काचे जे पाणी आहे ते मिळणारच आहे, परंतु समुद्रात वाहून जाणारे पाणी मात्र गुजरातला देण्याबाबत केंद्रशासनाचा प्रस्ताव आहे. केंद्रशासनाच्या नद्या जोड प्रकल्पाअंतर्गत त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे सांगून खडसे म्हणाले की, महाराष्ट्रात असलेले पाणी १२०० मीटरवर उचलणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते. तथापि, हे पाणी महाराष्ट्रात उपलब्ध होऊ शकते ते दिले जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
जोड आहे.

Web Title: Uddhav Thackeray's support for outside support from outsiders: Pranab Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.