उद्धव ठाकरेंना हवा नरेंद्र मोदींचा हस्तक्षेप
By Admin | Updated: September 23, 2014 04:34 IST2014-09-23T04:34:14+5:302014-09-23T04:34:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निर्णायक चर्चा व्हावी आणि गुंता सुटावा अशी शिवसेनेची इच्छा असल्याचे संकेत मिळाले

उद्धव ठाकरेंना हवा नरेंद्र मोदींचा हस्तक्षेप
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निर्णायक चर्चा व्हावी आणि गुंता सुटावा अशी शिवसेनेची इच्छा असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रात भारतीय मुस्लिमांबद्दल मोदींनी केलेल्या विधानाचे समर्थन करण्यात आले असून मोदींची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी करण्यात आल्याचे पाहता तडजोड शक्य असल्याचा सूरही व्यक्त होत आहे.
अधिक जागांवरून ताणले गेलेले संबंध पाहता दोन्ही पक्षांनी २५ वर्षांपासूनची युती कायम ठेवण्यासाठी कवायत चालविल्याचे सोमवारी दिसून आले. पितृपक्ष संपताच जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रालोआतील सर्वात जुन्या घनिष्ट मित्रांमध्ये वाटाघाटी न होण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा अहंकार आड आल्याचे मानले जाते.