शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'सामाजिक दुष्कृत्यांसाठी सनातन धर्म जबाबदार', उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 20:46 IST

'आज I.N.D.I.A. आघाडीचा हिंदुविरोधी चेहरा उघड झाला'; भाजपची टीका

Udaynidhi Stalin Statement: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्य सरकारमध्ये क्रिडा मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यावरुन तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत गदारोळ सुरू झाला आहे. अनेक नेते स्टॅलिन यांच्यावर टीका करत असून, वक्तव्य मागे घेण्याची मागणी होत आहे. पण, उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

संबंधित बातमी- उदयनिधी स्टॅलिनच्या 'सनातन धर्म मिटवा' विधानावर काँग्रेसची प्रतिक्रिया; नाना पटोले म्हणाले...

उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया, डेंग्यू अन् कोरोनाशी केली आणि याला संपवायला पाहिजे, असे असे म्हटले. उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर भाजप INDIA आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत आहे. DMK इंडिया आघाडीचा भाग असल्यमुळे, संपूर्ण आघाडी भाजपच्या निशाण्यावर आली आहे. काँग्रेसनेही या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे. तरीदेखील, उदयनिधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.

'माझ्या वक्तव्यावर ठाम'या विधानावरुन झालेल्या वादानंतर आपण आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचे उदयनिधी यांचे म्हणणे आहे. त्यांनी भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, 'मी सनातन धर्मामुळे पीडित आणि उपेक्षितांच्या वतीने बोललो. मी बोललेल्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. सनातन धर्म आणि त्याचा समाजावर होणारा नकारात्मक परिणाम, याविषयी विस्तृत संशोधन करणारे पेरियार आणि आंबेडकर यांचे विस्तृत लेखन कोणत्याही व्यासपीठावर मांडण्यास मी तयार आहे.'

'मी माझ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा सांगतो, डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाप्रमाणे सामाजिक दुष्कृत्यांसाठी सनातन धर्म जबाबदार आहे. माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी मी तयार आहे, मग ते कायद्याचे न्यायालय असो किंवा लोकांचे न्यायालय असो. खोट्या बातम्या पसरवणे थांबवा,' असे ट्विट त्यांनी केले.

काय म्हणाले अमित मालवीय? 'राहुल गांधी प्रेमाच्या दुकानाविषयी बोलतात, पण काँग्रेसचा मित्रपक्ष द्रमुकचे वंशज सनातन धर्म नष्ट करण्याविषयी बोलतात. काँग्रेसचे मौन हे नरसंहाराच्या या आवाहनाचे समर्थन आहे. आज I.N.D.I.A. आघाडीचा भारतविरोधी आणि हिंदुविरोधी चेहरा उघड झाला आहे. I.N.D.I.A. आघाडीला संधी मिळाली, तर ते हजारो वर्षे जुन्या सनातन धर्माला नष्ट करतील,' अशी टीका त्यांनी केली.

संबंधित बातमी- सनातन धर्म मिटवा म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना अन्नामलाईंचं प्रत्युत्तर म्हणाले...

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमHinduहिंदूINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा