खासदारकीची शपथ घेताच उदयनराजेंना केंद्रात मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:11 PM2020-07-23T22:11:50+5:302020-07-23T22:12:47+5:30

उदयनराजेंचा राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी सोहळा चांगलाच वादात सापडला होता. मात्र, उदयनराजेंनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन तो वाद संपुष्टात आणला

Udayan Raje has a big responsibility at the Center as soon as he is sworn in as an MP | खासदारकीची शपथ घेताच उदयनराजेंना केंद्रात मोठी जबाबदारी

खासदारकीची शपथ घेताच उदयनराजेंना केंद्रात मोठी जबाबदारी

Next
ठळक मुद्देउदयनराजेंचा राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी सोहळा चांगलाच वादात सापडला होता. मात्र, उदयनराजेंनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन तो वाद संपुष्टात आणला

नवी दिल्ली - भाजपा नेते आणि खासदारउदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर, उदयनराजेंसह भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा केली. उदयनराजेंना भाजपाकडून मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा होती. त्यानुसार, उदयनराजेंना संसदेच्या स्थायी समितीत स्थान मिळाले आहे. 

उदयनराजेंचा राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी सोहळा चांगलाच वादात सापडला होता. मात्र, उदयनराजेंनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन तो वाद संपुष्टात आणला. तर, दुसरीकडे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही मी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचा उपासक असल्याचे ट्विट करुन सांगितले. त्यानंतर, उदयनराजेंच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आली आहे. संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात उदयनराजेंनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

संसदेच्या या स्थायी समितीत शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. तर, उदयनराजे यांच्याकडे रेल्वे खात्याचा पदभार देण्यात आलाय. रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. तर चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचं लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे हेही महत्वाचं खात असून तिथेही मराठी खासदार उदयनराजे भोसले यांना जबाबदारी देण्यात आली आहे. 

कोणाकडे कोणती कमिटी :  
- विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन.
- शरद पवार : डिफेन्स कमिटी 
- उदयनराजे : रेल्वे कमिटी
 - प्रियांका चतुर्वेदी : कॉमर्स कमिटी
 - डॉ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी
 - ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी
- रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी 
- राजीव सातव : डिफेन्स कमिटी
 

Web Title: Udayan Raje has a big responsibility at the Center as soon as he is sworn in as an MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.