महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून करणा-या उबेरच्या कॅब चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2015 13:10 IST2015-07-22T13:08:18+5:302015-07-22T13:10:43+5:30
महिला प्रवाशासमोर हस्तमैथून करणा-या उबेरच्या विकृत टॅक्सी चालकाला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे.

महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून करणा-या उबेरच्या कॅब चालकाला अटक
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २२ - महिला प्रवाशासमोर हस्तमैथून करणा-या उबेरच्या विकृत टॅक्सी चालकाला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. पिंटू यादव असे या चालकाचे नाव असून गुन्हा दाखल होताच उबेरने पिंटूला कामावरुन काढून टाकल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
दिल्लीतील एका महिला प्रवाशासमोर टॅक्सी चालकाने हस्तमैथून केल्याची ताजी असतानाच पश्चिम बंगालमधील महिला प्रवाशासोबतही ही दुर्दैवी घटना घडली आहे. कोलकात्यातील एका मॉलमध्ये काम करणा-या २५ वर्षीय तरुणी काही दिवसांपूर्वी उबेर कॅबमधून प्रवास करत होती. कॅब चालक पिंटू यादवने गाडी निर्जनस्थळी नेत महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केले. महिलेने या प्रकाराला विरोध दर्शवताच त्याने पिडीत महिलेला धमकावले. टॅक्सीतून सुटका झाल्यावर पिडीत महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी पिंटू यादवला २० जुलैरोजी अटक केली आहे. पिंटू यादवला कामावरुन काढून टाकले असून उबेरने दिलेल्या प्रतिसादावर पिडीत महिलेनेही समाधान व्यक्त केले आहे अशी माहिती उबेरच्या अधिका-यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.