उबेर टॅक्सी बलात्कार: दोषी शिव कुमार यादवला जन्मठेप

By Admin | Updated: November 3, 2015 16:09 IST2015-11-03T16:03:02+5:302015-11-03T16:09:21+5:30

दिल्लीत गेल्या वर्षी उबेर कॅबमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी टॅक्सी चालक शिवकुमार यादवला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Uber taxi rape: convicted Shiv Kumar Yadav Yadav's life imprisonment | उबेर टॅक्सी बलात्कार: दोषी शिव कुमार यादवला जन्मठेप

उबेर टॅक्सी बलात्कार: दोषी शिव कुमार यादवला जन्मठेप

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३  - राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी उबेर कॅबमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी टॅक्सी चालक शिवकुमार यादवला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. टॅक्सीचालक शिव कुमार यादवने गेल्या वर्षी एका तरूणीवर टॅक्सीतच बलात्कार केला होता, याप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने त्याला गेल्या आठवड्यात दोषी ठरवले होते, अखेर आज आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 
गेल्या वर्षी ५ डिसेंबर २०१४ मध्ये रोजी पीडित तरूणीने इंदरलोक येथे आपल्या घरी जाण्यासाठी मोबाईल अॅपवरून उबेरकडून टॅक्सी मागवली होती. शिवकुमार यादव ही टॅक्सी चालवत होता. त्याने टॅक्सी एका निर्जन स्थळी नेऊन तरूणीवर बलात्कार केला आणि झाल्या प्रकराची वाच्यता न करण्याची धमकी देऊन तरूणीला घरी सोडले.  मात्र त्या तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यादवला ७ डिसेंबर रोजी मथुरा येथून अटक केली. यावर्षी जानेवारी महिन्यात दिल्ली न्यायालयात शिवकुमार यादवविरुद्ध कलम ३६६ आणि ३२३ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान शिवकुमार यादवने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: Uber taxi rape: convicted Shiv Kumar Yadav Yadav's life imprisonment