उबेरची मुंबईतही अरेरावी तरूणीशी शाब्दीक बाचाबाची

By Admin | Updated: June 6, 2015 00:34 IST2015-06-06T00:34:57+5:302015-06-06T00:34:57+5:30

उबेरची मुंबईतही अरेरावी

Uber is also in Mumbai, who is also in a bad situation | उबेरची मुंबईतही अरेरावी तरूणीशी शाब्दीक बाचाबाची

उबेरची मुंबईतही अरेरावी तरूणीशी शाब्दीक बाचाबाची

ेरची मुंबईतही अरेरावी
तरूणीशी बाचाबाची
मुंबई:
दिल्लीत उबेर टॅक्सीमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्यानंतर आता मुंबईतही या टॅक्सीच्या चालकाने एका तरूणीशी अरेरावी करत तुम्हाला बघून घेईन, असे धमकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरूणीने हा प्रकार झाल्यानंतर फेसबुकवर हा प्रकार मांडला. ही घटना घडली तेव्हा तरूणीचे सहकारी तिच्यासोबत होते. मात्र सहकारी नसते तर माझे काय झाले असते, असा सवालही तिने उपस्थित केला आहे. उबेरने याची दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
गुरूवारी लोअर परळ येथील कार्यालयातून निघालेल्या तरुणीने उबेरची टॅक्सी आरक्षित केली. लोअर परळ ते अंधेरीतील लोखंडवाला येथे जाण्यासाठी इनोव्हा कंपनीची खासगी टॅक्सी घेतली. जुहू येथे एका सिग्नलवर तरुणीचे सहकारी टॅक्सीतून उतरल्यावर चालकाने तरूणीशी वाद घालण्यास सुरूवात केली. ही सेवा मुंबई दर्शनासाठी नाही. तुमच्या सारख्या लोकांना काही पिवळी टॅक्सीच योग्य आहे, उबेर सेवा घेण्याची तुमची क्षमता नाही, असे टॅक्सी चालक तरूणी व तिच्या मित्रावर ओरडत होता. त्यानंतर त्याने मी तुम्हाला बघून घेतो, तुम्ही स्वत:ला काय समजता, असेही टॅक्सी चालकाने त्यांना धमकावले. त्यामुळे त्यांनी टॅक्सी उतरण्याचा निर्णय घेतला.
ही घटना घडल्यानंतर तरूणीने फेसबूकवर याची जाहिर तक्रार केली. उबेरने चालकांना चांगल्या व सौजन्यपूर्ण वागणुकीची शिकवण द्यायाला हवी, असेही तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.
सुरक्षा, सुविधा आणि ग्राहक सेवा या तिन्ही गोष्टी उबेरकडून मिळालेल्या नाहीत. प्रवासात मी जर एकटी असती तर माज्यावर कोणता प्रसंग ओढवला असता, असा प्रश्नही तिने उपस्थित केला. त्यावर उबेरने या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Uber is also in Mumbai, who is also in a bad situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.