नक्षल्यांच्या बॉम्बस्फोटात दोन जवान जखमी

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:56+5:302015-02-21T00:49:56+5:30

रायपूर :छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्‘ातील एमारगुंडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या एका प्रेशर बॉम्बच्या स्फोटात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. एमारगुंडा गावाजवळ सुरक्षा दलाचे जवान कोंबिंग ऑपरेशन राबवित असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडविला.

Two youths injured in Maoist blasts | नक्षल्यांच्या बॉम्बस्फोटात दोन जवान जखमी

नक्षल्यांच्या बॉम्बस्फोटात दोन जवान जखमी

यपूर :छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एमारगुंडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या एका प्रेशर बॉम्बच्या स्फोटात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. एमारगुंडा गावाजवळ सुरक्षा दलाचे जवान कोंबिंग ऑपरेशन राबवित असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडविला.
सुरक्षा दलाचे जवान नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या बॉम्बच्या संपर्कात आले आणि बॉम्बस्फोटात जखमी झाले. हेड कॉन्स्टेबल राजेश सेन आणि असिस्टंट कॉन्स्टेबल आशाराम नेताम अश्ी जखमींची नावे आहेत. या दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माओवाद्यांनी शुक्रवारी छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये एक दिवसाचा बंद पाळण्याचे आवाहन केले होते.

Web Title: Two youths injured in Maoist blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.