२ वर्ष पडून होता मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी २ वर्ष प्रतीक्षा : अखेर भंगारात जमा; पुण्याहून सुटा भाग आलाच नाही
By Admin | Updated: December 20, 2015 23:59 IST2015-12-20T23:59:30+5:302015-12-20T23:59:30+5:30
जळगाव: घनकचरा प्रकल्पावर कचरा डम्पींगसाठी दिलेला मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी पुण्याला पाठविलेला गिअरचा भाग परतच न आल्याने तब्बल २ वर्षांपासून प्रकल्पस्थळीच पडून अखेर भंगारात जमा झाला आहे.

२ वर्ष पडून होता मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी २ वर्ष प्रतीक्षा : अखेर भंगारात जमा; पुण्याहून सुटा भाग आलाच नाही
ज गाव: घनकचरा प्रकल्पावर कचरा डम्पींगसाठी दिलेला मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी पुण्याला पाठविलेला गिअरचा भाग परतच न आल्याने तब्बल २ वर्षांपासून प्रकल्पस्थळीच पडून अखेर भंगारात जमा झाला आहे. एमआयडीसीतील फायर स्टेशन येथे सुरक्षित स्थळी हा बुलडोझर अखेर हलविण्यात आला आहे. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे अनेक किस्से समोर येत असतात. वाहन विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. मनपाने कचरा डम्पींगसाठी हंजीर बायोटेक प्रकल्पावर दिलेला बुलडोझर गिअरमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी बंद पडला. त्याचा तो खराब झालेला भाग दुरुस्तीसाठी वाहन विभागाने पुण्याला पाठविला. तोपर्यंत हे बुलडोझर व्यवस्थितपणे कार्य करीत होते. पुण्याहून तो सुटा भाग किमान दोन-तीन महिन्यात परत येणे अपेक्षित होते. मात्र तब्बल दोन वर्ष उलटली तरीही तो सुटा भाग आलाच नाही. वाहन विभागानेही लक्ष दिले नाही. त्यामुळे हे बुलडोझर हंजीर प्रकल्पस्थळीच पडून राहिले. उन पावसात सापडून गंजून गेले. वाहन विभाग प्रमुख म्हणून अभियंता सुनील भोळे यांनी पदभार घेतल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने शहर अभियंता यांना ही बाब निदर्शनास आणून देत हा बुलडोझर तेथून सुरक्षित स्थळी हलविणे अपेक्षित असल्याचे सांगितले.शहर अभियंता थोरात यांनी १५ ऑक्टोबर रोजी हंजीर प्रकल्पस्थळी जाऊन या बुलडोझरची पाहणी केली. तसेच तातडीने हे बुलडोझर एमआयडीसीतील अग्नीशमन केंद्राच्या आवारात हलविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ट्रकवर ठेवून हे बुलडोझर तेथे हलविण्यात आले. ---- इन्फो---कालबा झालाहा बुलडोझर गिरणा पंपींग कार्यान्वित असताना गिरणेत वाळूचा बंधारा घालण्यासाठी वापरला जात होता. त्यानंतर तो हंजीर प्रकल्पावर देण्यात आला. १५-१६ वर्ष झाल्याने हा बुलडोझर कालबा झाल्याचे मनपा वाहन विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. ---- इन्फो---इतर सुट्या भागांची चोरीहा बुलडोझर दोन वर्ष बेवारस पडून राहिल्याने त्याच्या काही सुट्या भागांची चोरी झाली असून आता परत हा बुलडोझर सुरू करणे अवघड झाले आहे. त्यामुळे हा बुलडोझर आता भंगारातच काढावा लागणार असल्याचे समजते.