शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गंगेत सुटकेस फेकण्यासाठी आल्या मायलेकी; बॅग उघडल्यावर सापडला महिलेचा मृतदेह, स्थानिकांनी पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:51 IST

कोलकातामध्ये नदीवर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली.

Kolkata Crime: गेल्या काही दिवसांमध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकही सतर्क झाले आहेत. याच सतर्कतेमुळे पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये सुटकेसमधून मृतदेहाची विल्हेवाट लावताना स्थानिकांनी आई आणि मुलीला रंगेहात पकडले आहे. आई आणि मुलगी घेऊन चाललेली सुटकेस बघून सुरुवातीला लोकांना त्यात कपडे किंवा सामान असेल असं लोकांना वाटलं. पण नंतर संशय आल्यानंतर याबाबत विचारलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. महिलांच्या हातातील सुटकेस उघडली असता बॅगेत एका महिलेचा मृतदेह होता.

कोलकाताच्या कुमारतुली काठावर मंगळवारी एक महिला आणि तिची मुलगी जड ट्रॉली बॅग घेऊन आली होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे लोकांना संशय आला आणि नदीच्या काठावर ट्रॉली बॅग कशासाठी अशी शंका निर्माण झाली. लोकांनी विचारायला सुरुवात केल्यावर घाबरेलेल्या महिलेने त्यात आमचे मेलेलं श्वान आहे असं सांगितले. लोकांना काहीतरी वेगळं प्रकरण असल्याचे वाटताच त्यांनी महिलेला आणि तिच्या मुलीला थांबवून ठेवलं आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये एका महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्या सुटकेससह दोन्ही मायलेकीला पोलीस ठाण्यात आणलं.

फाल्गुनी घोष आणि तिची आई आरती घोष असे अटक केलेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत. सुमिता घोष (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमिता घोष या फाल्गुनी घोषच्या सासऱ्याची बहीण असल्याचे समर आलं आहे. फाल्गुनी आणि आरती घोष या मंगळवारी सकाळी आठ वाजता उत्तर कोलकाता येथील कुमारतुली इथल्या गंगेच्या काठावर निळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगसह आल्या होत्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने लोकांनी त्यांना बॅग उघडून दाखवायला सांगितली. सुरुवातीला बऱ्याच वेळा नकार दिल्यानंतर बॅगेत श्वानाचा मृतदेह असल्याचे आरती घोष यांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी येऊन बॅग खोलली तेव्हा एका महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ दोघींनाही अटक करुन पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीदरम्यान फाल्गुनीने मृत महिला माझ्या सासऱ्यांची बहीण सुमिता घोष असल्याचे सांगितले. आसामच्या सुमिता घोष या अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळ्या राहत होत्या. ११ फेब्रुवारी रोजी त्या कोलकाता येथील त्यांच्या आई वडिलांच्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या. 

पोलिसांच्या चौकशीत फाल्गुनीसोबत झालेल्या वादात सुमिता यांचा मृत्यू झाला. फाल्गुनीचे तिच्या पतीसोबत संबंध ठीक नसल्याने ती वेगळी राहत होती. सोमवारी संध्याकाळी काही कारणावरुन फाल्गुनी आणि सुमिता यांच्या काही कारणावरुन वाद होऊन हाणामारी झाली. फाल्गुनीने सुमिताला भिंतीवर ढकलले आणि ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर त्यांच्यात पुन्हा मारामारी सुरू झाली. यावेळी फाल्गुनीने सुमिताच्या चेहऱ्यावर आणि मानेवर विट मारली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरती आणि फाल्गुनीने सुमिताचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरुन गंगा नदीत टाकण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस