ट्रॅक्टरला दुचाकी धडकून तिघे जखमी

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30

कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडीनजीक उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लखमापूरचे तीन युवक सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एमएच-२०-सीके-५९८०) वर सावखेड्याहून लखमापूर येथील घरी परतत होते. त्यावेळी ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील गोरख दीपचंद कोरडकर (३२), ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (३०), (दोघेही रा. लखमापूर) व विजय बाबासाहेब नजन (२३, रा. कायगाव) जखमी झाले. जखमींना रात्री उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स.पो.नि. पंडित सोनवणे, पोहेकॉ के.एस. मंचरे पुढील तपास करीत आहेत.

Two wheelers hit the tractor and two injured | ट्रॅक्टरला दुचाकी धडकून तिघे जखमी

ट्रॅक्टरला दुचाकी धडकून तिघे जखमी

यगाव : औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावर गणेशवाडीनजीक उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लखमापूरचे तीन युवक सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एमएच-२०-सीके-५९८०) वर सावखेड्याहून लखमापूर येथील घरी परतत होते. त्यावेळी ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील गोरख दीपचंद कोरडकर (३२), ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाहुले (३०), (दोघेही रा. लखमापूर) व विजय बाबासाहेब नजन (२३, रा. कायगाव) जखमी झाले. जखमींना रात्री उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स.पो.नि. पंडित सोनवणे, पोहेकॉ के.एस. मंचरे पुढील तपास करीत आहेत.

रासेयो शिबिराचा समारोप
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथे श्री मुक्तानंद महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा समारोप करण्यात आला.
मुद्देशवाडगावात ७ दिवस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छतेचा संदेश देतानाच घरोघरी जाऊन शोषखड्डे निर्माण केले. खोदकाम करून पाईपच्या साह्याने स्वच्छतागृहाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाईप लावले. वृक्षदिंडी काढून पर्यावरण, पाणी, स्वच्छता, शौचालयाचे महत्त्व, वृक्षसंरक्षण, बेटी बचाव त्याचप्रमाणे गावात सलोख्याचे वातावरण राहण्यासाठी जनजागृती केली.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियामाक मंडळाचे सदस्य प्रशांत माने होते. प्रमुख पाहुणे डॉ. राजेश करपे यांनी भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे असा संदेश दिला. यावेळी स्थानिक नियामाक मंडळाचे इकबाल सिद्दीकी, अमोल वरकड, प्राचार्य शिवाजीराव मुंढे, उपप्राचार्य सुरेश पैठणकर, डॉ. रविकिरण सावंत, सरपंच वैशाली रोकडे, सचिन माने, एस.ए. मंडलिक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
७ दिवस झालेल्या कामाचा अहवाल कार्यक्रमाधिकारी डॉ. द्रौपदी पंदिलवाड यांनी वाचला, सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण देशपांडे यांनी केले. आभार डॉ. संदीप गायकवाड यांनी मानले.

Web Title: Two wheelers hit the tractor and two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.