मारहाण करुन दुचाकी व मोबाईल लांबविणार्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:03 IST2016-03-13T00:03:38+5:302016-03-13T00:03:38+5:30
फोटो सचिन

मारहाण करुन दुचाकी व मोबाईल लांबविणार्या दोघांना अटक
फ टो सचिनजळगाव : दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याला मारहाण करुन त्याच्या ताब्यातील दुचाकी व मोबाईल हिसकावून नेणार्या तंजीम बेग नसीम बेग मिर्झा व किरण रामदास चव्हाण (दोन्ही रा.तांबापुरा, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून चोरलेली दुचाकी व मोबाईल असा ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.राजेश रावजी घोणमोडे (वय २८ रा.भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजी नगर जळगाव, मुळ रा.नागपूर) हा सोमवारी रात्री पावणे बारा वाजता कपंनीतून घरी जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दोन तरुणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली होती. त्याच्या ताब्यातील २५ हजार रुपये किमतीची दुचाकी व २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल या दोघांनी पळविला होता.या घटनेनंतर राजेश प्रचंड घाबरला होता. त्यामुळे त्याने दोन दिवस कुठेच वाच्यता केली नाही.भीतीतून सावरल्यानंतर राजेश याने शुक्रवारी रात्री दहा वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. रात्रभर चालली शोध मोहीमसंशयिताच्या वर्णनावरुन पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी रात्रीच गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक एन.बी.सुर्यवंशी, सहायक फौजदार रत्नाकर झांबरे,हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, संदीप पाटील, शशिकांत पाटील, मनोज सुरवाडे, विजय पाटील, किशोर पाटील व नितीन बाविस्कर आदींचे पथक आरोपींच्या शोधासाठी पाठविले. या पथकातील प्रत्येकाने आपआपल्या खबर्यामार्फत माहिती काढून रात्रीच मोहीम राबवून पहाटेच्या सुमारास दोघांना तांबापुरातून ताब्यात घेतले. दोघांना गुन्ाची कबुली देत मुद्देमालही काढून दिला.