एकाच क्रमांकाची दोन वाहने जप्त

By Admin | Updated: May 18, 2014 21:00 IST2014-05-18T19:57:02+5:302014-05-18T21:00:39+5:30

आकोट शहरात एकाच क्रमांकाच्या दोन इंडिका कार पोलिसांनी जप्त केल्या; आरोपीस अटक

Two vehicles of the same number were seized | एकाच क्रमांकाची दोन वाहने जप्त

एकाच क्रमांकाची दोन वाहने जप्त

आकोट : शहरातील अग्रसेन पार्कमागील मंगलगृहातील लग्नाच्या वाहनांच्या ताफ्यातील एकाच क्रमांकाच्या दोन इंडिका कार पोलिसांनी जप्त केल्या असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आकोट शहरातील नीलेश सुभाष बोरोडे यांचे नावावरील या दोन्ही इंडिका कार्सचा क्रमांक एमएच ३० एएफ २०७७ आहे. या दोन्ही गाड्या झुनझुनवाला अतिथीगृहातील लग्नाच्या वाहनांच्या ताफ्यात उभ्या होत्या. ही खबर पोलिसांना लागताच पीएसआय प्रेमानंद कात्रे हे त्यांचे ताफ्यासह वाहने उभी असल्या ठिकाणी पोचले. तेथील दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात पीएसआय प्रेमानंद कात्रे यांचे तक्रारीवरून नीलेश बोरोडे यांचे विरोधात जा. फौ. कलम ४१ (१, ४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास प्रेमानंद कात्रे करीत आहेत. 

Web Title: Two vehicles of the same number were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.