किरकोळ भांडणामधून दोन वाहने फोडली

By Admin | Updated: July 3, 2015 23:15 IST2015-07-03T23:15:46+5:302015-07-03T23:15:46+5:30

फोटो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये रिक्षा नावाने

Two vehicles broke through a minor fight | किरकोळ भांडणामधून दोन वाहने फोडली

किरकोळ भांडणामधून दोन वाहने फोडली

टो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये रिक्षा नावाने

पुणे : मित्रासोबत झालेल्या भांडणामधून दोन वाहने फोडण्यात आल्याची घटना शुक्रवार पेठेतील रजनीगंधा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एक रिक्षा आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे.
कुणाल कुंदर (रा. शुक्रवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय मारुती ढोरे (रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोरे यांच्या मुलाची कुणाल कुंदर याच्यासोबत शुक्रवारी दुपारी भांडणे झाली होती. त्याचा राग काढण्यासाठी कुंदर याने रात्री सव्वानऊच्या सुमारास रजनीगंधा अपार्टमेंटमध्ये उभ्या केलेल्या ढोरे यांच्या ऑटो रिक्षाची दांडक्याने मारुन काच फोडली. तर तेथेच उभ्या करण्यात आलेल्या दुचाकीवरही दांडक्याने प्रहार करुन नुकसान केले. वाहनांची तोडफोड केल्यावर कुंदर घटनास्थळावरुन पळून गेला.

Web Title: Two vehicles broke through a minor fight