शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मोदीच पंतप्रधान हवेत; ६३ टक्के जनतेची इच्छाः सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 11:19 IST

देश आणि जगभरातील जवळपास 63 टक्क्यांहून अधिक लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी हवे आहे

नवी दिल्ली- देश आणि जगभरातील जवळपास 63 टक्क्यांहून अधिक लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी हवे आहे. एका ऑनलाइन सर्व्हेतून हे समोर आलं आहे. या सर्व्हेमध्ये भाग घेणा-या 50 टक्के लोकांनी मोदी दुस-यांदा पंतप्रधान झाल्यास देशाला चांगलं भविष्य लाभेल, असं मत नोंदवलं आहे. न्यूज पोर्टल डेली हंट आणि डेटा विश्लेषण करणारी कंपनी नील्सन इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. या सर्व्हेत देश आणि विदेशातील 54 लाख लोकांनी सहभाग घेतला आहे. सर्वेक्षणानुसार, 63 टक्के लोकांनी मोदींवर 2014च्या तुलनेत जास्त विश्वास दाखवला आहे. तसेच गेल्या चार वर्षांत देशाला सक्षम नेतृत्व दिल्यानं लोकांनी समाधानही व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं या सर्व्हेला फेक म्हटलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, लाचार झालेल्या मोदी सरकारनं लोकांचा विश्वास गमावला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीतही भाजपाचा जबरदस्त पराभव होणार आहे. आता पैशाच्या जोरावर काही अयोग्य मार्गाचा वापर करून मोदी सरकार असे फेक सर्व्हे करत आहे. जेणेकरून पुन्हा जनतेची विश्वासार्हता कमावता येईल. अशा सर्व्हेंतून सरकारला समर्थन मिळत नसते.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांमध्ये मोदींची विश्वासार्हता आजही कायम आहे. तर मिझोरमध्ये कोणत्याही ट्रेंडविना हा सर्व्हे करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार संपवण्याच्या मुद्द्यावर 60 टक्के लोकांनी मोदींवर भरवसा दाखवला आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी मोदींनी देशाचं योग्य पद्धतीनं नेतृत्व केल्याचं 62 टक्के लोकांचं मत आहे. राहुल गांधी यांना 17 टक्के, अरविंद केजरीवाल यांना 8 टक्के, अखिलेश यादव यांना तीन टक्के आणि मायावती यांना दोन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. न्यूज पोर्टल डेली हंट आणि डेटा विश्लेषण करणारी कंपनी नील्सन इंडियानं स्पष्ट केलं आहे की, हा सर्व्हे कोणत्याही राजकीय हेतूनं प्रेरित होऊन केलेला नाही. देशातील जनतेचा आवाज समजावा, यासाठी हा सर्व्हे करण्यात आला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी