लष्कर-ए-तय्यबाच्या दोन अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 06:24 IST2018-10-26T06:24:31+5:302018-10-26T06:24:34+5:30
काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

लष्कर-ए-तय्यबाच्या दोन अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा
श्रीनगर : काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते दोघे लष्कर-ए-तय्यबाचे होते, असे पोलिसांनी सांगितले.
काही अतिरेकी त्या भागात लपून बसल्याची माहिती मिळताच आज सकाळपासूनच जवानांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दोघे ठार झाल्यानंतरही संध्याकाळपर्यंत चकमक सुरू होती. त्यामुळे त्या भागात आणखी काही अतिरेकी लपल्याचे दिसत आहे.