काश्मीर बडगाममध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
By Admin | Updated: April 22, 2017 21:28 IST2017-04-22T21:28:09+5:302017-04-22T21:28:09+5:30
जम्मू-काश्मीरच्या बडगाम हयातपूरा येथे सुरक्षा पथकाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

काश्मीर बडगाममध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
ऑनलाइन लोकमत
बडगाम, दि. 22 - जम्मू-काश्मीरच्या बडगाम हयातपूरा येथे सुरक्षा पथकाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. संध्याकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली. बडगामपासून 18 किमी अंतरावर हयातपूरा येथे गस्तीवर असलेल्या 53 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठार झाले.
चकमक सुरु होताच अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली. अजूनही ही चकमक सुरु असून, दहशतवादी लपलेल्या भागाला जवानांनी घेराव घातला आहे.
एका दहशतवाद्याची ओळख पटली असून युनी मकबूल गानाय असे त्याचे नाव आहे. चादूरा पात्रीगाम येथे राहणार हा दहशतवादी आहे. दुस-या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. एके-47 रायफल आणि अन्य शस्त्रास्त्रे घटनास्थळावरुन जप्त करण्यात आली आहेत.