शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काश्मीरच्या 'उरी'मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सैन्य दलाचं कोम्बिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 11:53 IST

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले.

मुंबई - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. गडोल कोकरनाग परिसरात सुरू असलेल्या कारवाईच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सुरक्षा दल चांगलेच आक्रमक दिसले. यावेळी ड्रोनद्वारे केलेल्या कोम्बिंगदरम्यान एक दहशतवादी जंगलात पळताना दिसला. तसेच, सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे ठिकाण सापडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, बारामुला जिल्ह्यातही सुरक्षा जवानांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू एन्काऊंटरमध्ये आणखी एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. सकाळपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. त्यानंतर, सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्या डोंगराळ भागात छोट्या नैसर्गिक गुहा असल्याने सैनिकांना कारवाईत वेळ लागत आहे. प्रत्येक गुहेत दहशतवादी लपलेले असू शकतात, त्यामुळे सुरक्षा दल सावधपणे पुढे जात आहे. लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना, शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाला. त्यामुळे या कारवाईत शहीद झालेल्या जवानांची संख्या चार झाली आहे.  दरम्यान, बारामुला येथेही सुरक्षा जवान आणि बारामुला पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. उरी व हशलंगा परिसरात दहशतवादी व सैन्य दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू होती. जवानांनी या चकमकीत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घातल्याचे काश्मीर झोनच्या पोलिसांकडून सांगण्यात आले.  

अनंतनागमध्येही सैन्याचं मोठं ऑपरेशन

शुक्रवारी केलेल्या ऑपरेशनमध्ये रणनीतीने कोम्बिंग करण्यात आले. कमांड सेंटरही घटनास्थळी आणण्यात आले. यासोबतच हेलिकॉप्टर आणि क्वाडकॉप्टरद्वारेही लक्ष्य निश्चित करण्यात आले. यानंतर स्पेशल फोर्सने बॉम्बफेक करून त्या लक्ष्यांना उद्ध्वस्त केले. गेल्या 3 दिवसात आतापर्यंत सहा गुहा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी जवानांनी शुक्रवारी आधुनिक शस्त्रांचा वापर केला. यामध्ये UBGL,ग्रेनेड लाँचर आणि आयईडी स्फोट करण्यात आले. तसेच, मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचीही मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून त्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndiaभारत