जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By Admin | Updated: October 15, 2015 09:29 IST2015-10-15T09:29:16+5:302015-10-15T09:29:48+5:30
जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १५ - जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त केल्याचे वृत्त आहे.
डोडा जिल्ह्यातील गडी नल्ला येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती स्थानिक पोलिस व सैन्याच्या जवानांना मिळाली होती. यानंतर पोलिस व सैन्याने संयुक्त मोहीम राबवत गुरुवारी सकाळी या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दोन्ही दहशतवाद्यांनी काही वर्षांपूर्वी पोलिसांसमोर शरणागती पत्कारली होती. मात्र त्यानंतर दोघेही पुन्हा दहशतवादी कारवायात सक्रीय झाले होते असे समजते.