श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
By Admin | Updated: June 25, 2017 14:11 IST2017-06-25T14:11:36+5:302017-06-25T14:11:36+5:30
काश्मीरमधील अजून एक दहशतवादी हल्ला लष्कराने हाणून पाडला आहे. श्रीनगरमधील पांथा चौक येथे झालेल्या चकमकीत लष्कराने

श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 25 - काश्मीरमधील अजून एक दहशतवादी हल्ला लष्कराने हाणून पाडला आहे. श्रीनगरमधील पांथा चौक येथे झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. रविवारी पहाटे सुरू झालेल्या या चकमकीत लष्कराचे दोन जवानसुद्धा जखमी झाले आहेत. याआधी शुक्रवारी याच ठिकाणी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला होता. त्यात लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सीआरपीएफच्या वाहनाला लक्ष्य केल्यानंतर दहशतवादी डीपीएस श्रीनगरच्या दिशेने पळाले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी काही स्थानिक लोकांनी लष्करावर दगडफेक केली होती. त्यामुळे लष्कराच्या मोहिमेत अडथळा आला होता.