काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
By Admin | Updated: November 14, 2014 17:20 IST2014-11-14T17:20:25+5:302014-11-14T17:20:25+5:30
उत्तर काश्मीरमधील कुलगम येथे लष्करासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १४ - उत्तर काश्मीरमधील कुलगम येथे लष्करासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. छेनिगम या गावात दहशतवादी आल्याचे पोलिसांना समजले असता त्यांनी राष्ट्रीय रायफलची एक तुकडी व केंद्रीय राखीव पोलिस दलाची १८ बटालीयन यांच्या सहाय्याने शोध मोहिम सुरु केली.
गुरुवार पासून ही शोध मोहीम सुरु होती. शोध मोहिमेदरम्यानच पोलिसांची दहशतवाद्यासोबत चकमक झाली असता या चकमकीत दोन जवानांसह दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.