चंदीगढ - कुंडल (जिल्हा फाजिल्का) खेड्यात सरकारी शाळेच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅडस आढळल्यानंतर मुलींचे कपडे काढल्याचा आरोप असलेल्या दोन महिला शिक्षिकांच्या बदल्यांचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शनिवारी दिले.मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाचे सचिव कृष्णन कुमार यांना या आरोपांची चौकशी सोमवारपर्यंत करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. कोणती मुलगी सॅनिटरी पॅडस् वापरत होती याचा शोध शिक्षक घेत होते, असे बोलले गेले. तीन दिवसांपूर्वीच्या या घटनेत शाळेच्या परिसरात काही मुली रडत असल्याचे तर काही मुली शिक्षिकांनी आमचे कपडे काढल्याची तक्रार करत असल्याचे व्हिडिओत दिसले. सातवीतील १५ मुलींना वर्गात बोलावून आठवीतील चार मुलींना कोणत्या मुलीने हे पॅडस् वापरले हे शोधण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)
मुलींना कपडे उतरविण्यास भाग पाडणाऱ्या दोन शिक्षिकांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:25 IST