खून प्रकरणातील दोन्ही संशयित फरार
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:20+5:302015-02-18T00:13:20+5:30
संदीप फाउण्डेशन येथील प्रकरण

खून प्रकरणातील दोन्ही संशयित फरार
स दीप फाउण्डेशन येथील प्रकरणत्र्यंबकेश्वर : संदीप फाउण्डेशन येथील खुनातील मयत युवकाचे वडील नाना तुकाराम बोरसे (४८) रा. सातपूर यांनी रवींद्र याचा खून झाल्याची फिर्याद त्र्यंबक पोलिसांकडे दाखल केली आहे. तथापि संशयित मारेकरी दिनेश आवारी (रा. गंगापूर गाव) व किरण जाधव (रा. आनंदवली) हे दोघेही फरारी आहेत. पोलिसांना ते सापडले नसून कसोशीने तपास करीत आहेत. त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्ाची नोंद, मयताचे कपडे, गुन्ात वापरलेली हत्यारे आदि सर्व पोलिसांनी जप्त केली आहेत. मात्र आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपीला मदत करणारे साथीदार व प्रत्यक्ष गुन्ातील आरोपी असे फरार झाले आहेत. अद्यापही आरोपी न सापडल्याने पोलीस अंधारातच चाचपडत आहेत. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, (एलसीबी) क्राईम ब्रँचतर्फे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. (वार्ताहर)