शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कौतुकास्पद! चिमुकल्यांना रस्त्यावर सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा; जमा केल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:47 IST

दोन निरागस मुलांनी जमिनीवर पडलेल्या हजारो रुपयांच्या नोटा पोलिसांना देऊन प्रामाणिकपणा दाखवल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात इयत्ता तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या दोन निरागस मुलांनी जमिनीवर पडलेल्या हजारो रुपयांच्या नोटा पोलिसांना देऊन प्रामाणिकपणा दाखवल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. शाळा व्यवस्थापनामार्फत 8 हजार 900 रुपये पोलिसांकडे जमा करण्यात आले. दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा पाहून एसडीओपीही भारावून गेले. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने मुलांना बक्षिसे देऊन सन्मानित केलं. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारवाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. सरस्वती शिशू मंदिर येथे इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी विशाल आणि इयत्ता तिसरीत शिकणारा यश या दोघांना दुपारी शाळेबाहेरील रस्त्यावर चलनी नोटा पडलेल्या दिसल्या. रस्त्यावर खूप नोटा पडलेल्या पाहून दोन्ही मुलांना सर्वप्रथम धक्काच बसला. मग त्यांनी एक एक करून सर्व नोटा जमा केल्या.

हजारो रुपये घेऊन मुलांनी थेट वर्गशिक्षकाकडे जाऊन रस्त्यात नोटा सापडल्याची माहिती दिली. मुलांना मिळालेल्या पैशाची माहिती शिक्षकाने शाळेचे व्यवस्थापक रामकिशन जैस्वाल यांना दिली.जयस्वाल यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना रकमेसह पोलीस ठाण्यात पाठवलं. पोलीस स्टेशनमध्ये मुलांनी माहिती देताना 8900 रुपयांची ही रक्कम एसडीओपी अर्चना रावत यांच्याकडे सुपूर्द केली. दोन्ही लहान मुलांचा प्रामाणिकपणा पाहून एसडीओपी अर्चना रावत भारावून गेल्या आणि त्यांनी मुलांचा सत्कार केला.

बरवाहच्या एसडीओपी अर्चना रावत म्हणाल्या, मुलं शाळेबाहेर खेळत असताना रस्त्यावर 8900 रुपये सापडले. यामध्ये सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय 200 आणि 100 रुपयांच्या नोटांचाही समावेश होता. मुलांनी प्रामाणिकपणा दाखवला आहे. त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. मात्र ही रक्कम घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. ते जर आले तर ही रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थी