ट्रॅक्टरखाली दबून दोन विद्यार्थी ठार
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:11+5:302015-08-28T23:37:11+5:30
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे दोन विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गणेश संजय गागरे (१५) गणेश अशोक जाधव (१७) ही मृतांची नावे आहेत. हे दोघे ट्रॅक्टर घेऊन शेत मशागतीसाठी गेले होते.

ट्रॅक्टरखाली दबून दोन विद्यार्थी ठार
अ मदनगर : नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे दोन विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गणेश संजय गागरे (१५) गणेश अशोक जाधव (१७) ही मृतांची नावे आहेत. हे दोघे ट्रॅक्टर घेऊन शेत मशागतीसाठी गेले होते.गुरुवारी रात्री पाऊस झाल्याने शेताची मशागत होऊ शकली नाही. म्हणून ट्रॅक्टर घेऊन ते घरी जाण्यासाठी निघाले असता करजगाव - पानेगांव शिवाराच्या पाटचारीत ट्रॅक्टर पलटी झाल्याने या दोन विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरखाली दबून अंत झाला. सोनई पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. ही दोन्ही मुले करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत होती.