नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:25+5:302014-12-20T22:28:25+5:30

मलकापूर : ससेगाव (ता. शाहूवाडी) येथील संकेत मारुती चिमणे (वय ११) व आर्यन पांडुरंग पाटील (वय ११) या दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

Two school children die drowning in river | नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

कापूर : ससेगाव (ता. शाहूवाडी) येथील संकेत मारुती चिमणे (वय ११) व आर्यन पांडुरंग पाटील (वय ११) या दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : संकेत व आर्यन दुपारी आपल्या मित्रांसमवेत गावाजवळ असणार्‍या आंबार्डी नदीत पोहायला गेले होते. नदीच्या पाण्यात पोहत असताना संकेत व आर्यन पाण्यात बुडाले. ते पाण्याबाहेर न आल्याने त्यांच्या मित्रांनी आरडाओरड केली असता तातडीने ग्रामस्थ जमा झाले. नदीच्या पाण्यात शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह सापडले. संकेत हा शाहू हायस्कूल, शाहूवाडी येथे पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील हॉटेल कामगार आहेत, तर आर्यन हा अल्फोन्सा स्कूल, करंजोशी येथे इंग्रजी शाळेत पाचवीत शिकत होता. या घटनेने ससेगाववर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. आर्यन हा एकुलता होता. घटनास्थळी उपसभापती नामदेव पाटल, माजी जि. प. सदस्य सर्जेराव पाटील, पो. नि. अशोक धुमाळ यांनी भेट दिली. दोघांच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तपास फौजदार ए. एस. धारपवार करीत आहेत.
-----------
फोटो मेल

Web Title: Two school children die drowning in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.