्नेरस्ता लूट करणारे दोघे जेरबंद गुन्हे शाखेची कारवाई : शिरूर परिसरातून अटक
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:13+5:302015-06-25T23:51:13+5:30
अहमदनगर : चाकूचा धाक दाखवून रस्ता लूट करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोन्ही आरोपी शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

्नेरस्ता लूट करणारे दोघे जेरबंद गुन्हे शाखेची कारवाई : शिरूर परिसरातून अटक
अ मदनगर : चाकूचा धाक दाखवून रस्ता लूट करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोन्ही आरोपी शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. निलेश पांडुरंग धोत्रे व नितीन मच्छिंद्र माने (रा. शिरूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. सुपा पोलीस ठाण्यात दोघांवरही जबरी चोरी, रस्ता लुटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या या गुन्ह्यात दोन्ही आरोपी पोलिसांना हवे होते. दोघे आरोपी शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेने शिरूर परिसरात सापळा लावला असता त्यांना दोघे आढळून आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता नगर-पुणे रोडवर पेट्रोल पंपावर थांबलेल्या जीपमधील लोकांना सत्तुरचा धाक दाखवून लुटल्याची कबुली दिली. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आणखी काही रस्ता लुटीचे गुन्हे त्यांनी केले असण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यासोबत आणखी किती साथीदार आहेत, याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, सहायक पोलीस निरीक्षक संजयकुमार सोने, दीपक हराळ, योगेश गोसावी, रवी सोनटक्के, दत्तात्रय हिंगडे, बाबासाहेब गरड, बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.