शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदी-नितीश कुमारांची मैत्री करून देणारे दोन 'Real Hero'; अशी आहे पडद्यामागची संपूर्ण 'स्टोरी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:41 IST

खरे तर राजकारण असो वा कुठलेही एखादे मिशण त्यात काही लोक पडद्यामागे राहून आपली भूमिकाही बजावत असतात. बिहारमध्येही भाजपा आणि जेडियू यांची मैत्री घडून आणण्यात पडद्या मागे राहून काम करणाऱ्या अशाच दोन व्यक्तींची महत्वाची भूमिका आहे. 

I.N.D.I.A. चा हात सोडून NDA ची गळाभेट घेत नितीश कुमार यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि बिहारमध्ये डबल इंजिन सरकारला सुरुवात झाली. हा भाजपच्या 2024 च्या यशाच्या दृष्टीने सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. खरे तर हा भाजपची चौकडी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांच्या उपक्रमाचे मोठे यश आहे.

खरे तर राजकारण असो वा कुठलेही एखादे मिशण त्यात काही लोक पडद्यामागे राहून आपली भूमिकाही बजावत असतात. बिहारमध्येही भाजपा आणि जेडियू यांची मैत्री घडून आणण्यात पडद्या मागे राहून काम करणाऱ्या अशाच दोन व्यक्तींची महत्वाची भूमिका आहे. 

बिहार-झारखंडचे क्षेत्रीय संघटन महामंत्री नागेंद्र जी -नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमध्ये डबल इंजिन सरकार स्थापन होण्यात भाजपकडून मुख्य भूमिका, बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संगटन महामंत्री नागेंद्र जी अर्थात नागेंद्र नाथ त्रिपाठी यांना मानले जात आहे. यापूर्वी ते बिहारचे संघटन महामंत्री होते. ते उत्‍तर प्रदेशातही आठ वर्षांपर्यंत संघटन महामंत्री राहिले आहेत.

बिहारच्या राजकारणात एनडीएच्या राजकारणाला बळकटी देण्याचे श्रेय नागेंद्र जी यांना जाते. मिशन 2024 साठी जेडीयूकडून जे प्रस्ताव त्यांच्याकडे आले, ते त्यांनी केंद्रीय रणनीतीकारांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. तसेच जेव्हा जेव्हा मतभेदाचा मुद्दा निर्माण झाला, तेव्हा- तेव्हा ती दरी भरून काढण्याचे कामही त्यांनी केले. आज सरकारमध्ये एनडीएची जी छबी दिसत आहे, ती त्यांनी जेडीयू नेते तथा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार केसी त्यागी यांच्यासमवेत तयार केला आहे. 

जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी देखील उत्तर प्रदेशातून येतात. हे नितीश कुमार यांचे अत्यंत जवळचे आणि मुख्य रणनितीकारही आहेत. राजकारणाच्या पटावर, मुख्यत्वे युती अथवा आघाडीच्या राजकारणात निवडणुकांमध्ये भाग घेण्यासंदर्भात अनेक किंतु-परंतु असतात. हे सोडविण्यात केसी त्यागी यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. केसी त्यागी आणि नागेंद्र जी हे दोघेही उत्तरप्रदेशचे असल्याने त्यंचे ट्यूनिंगदेखील चांगले आहे.

भाजपचे बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संगटन महामंत्री नागेंद्र नाथ त्रिपाठी आणि जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी.महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार स्थापन होण्यासाठी, जो काही अंतर्गत मसुदा तायर करण्यात आला तो या दोघांच्याही राजकीय परिपक्वतेचा परिपाक आहे. अंतिमतः भाजप आणि जेडीयूच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला मंजुरी दिल्यानंतर, बिहारमध्ये डबल इंजिन सरकार स्थापन होऊ शकले आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण