इसिसशी संबंधावरून गुजरातमध्ये 2 जणांना अटक
By Admin | Updated: February 26, 2017 13:07 IST2017-02-26T13:07:07+5:302017-02-26T13:07:07+5:30
गुजरातमध्ये इसिसशी संबंधित कोणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ,अटक करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ

इसिसशी संबंधावरून गुजरातमध्ये 2 जणांना अटक
>ऑनलाइन लोकमत,
राजकोट, दि. 26 - गुजरातमधून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन जणांना अटक केली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. गुजरातमधून इसिसशी संबंधित कोणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अटक करण्यात आलेले दोघेही कंप्यूटर हाताळण्यात माहीर असून दोघं सख्खे भाऊ आहेत.
यापैकी एका भावाला राजकोट तर दुस-याला भावनगरमधून अटक करण्यात आलं आहे. एकाने एमसीए, तर दुसऱ्याने बीसीएची पदवी घेतली आहे. सौराष्ट्रातील धार्मिक स्थळ, मॉल्स आणि अन्य प्रसिद्ध ठिकाणांवर हल्ला करण्याचं त्यांचं नियोजन होतं.
अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची पोलीस चौकशी करत आहेत.